होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डोंबिवलीत व्यापाऱ्यावर गोळीबार 

डोंबिवलीत व्यापाऱ्यावर गोळीबार 

Published On: Aug 03 2018 2:18AM | Last Updated: Aug 03 2018 2:18AMडोंबिवली : वार्ताहर

रमेश गोल्डच्या मालकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना गुरूवारी रात्री 11 वाजून 35 मिनिटांच्या सुमारास घडली. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मानपाडा रोडवरील नाना-नानी पार्कजवळ ही घटना घडली. हा गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांना जमावाने पकडून बेदम मारहाण केली. या गोळीबारात व्यापारी रमेश जैन हे सुदैवाने बचावले आहेत. 

पोलिसांकडून अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. तथापि गोळीबार करणारे दोघेजण होते. जमावाने या दोघांना बेदम झोडपून पोलिसांच्या हवाली केले. हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.