Thu, Nov 15, 2018 12:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे : पोलादपुरात लाचखोर मंडल अधिकारी जाळ्यात

ठाणे : पोलादपुरात लाचखोर मंडल अधिकारी जाळ्यात

Published On: Dec 12 2017 6:27PM | Last Updated: Dec 12 2017 6:27PM

बुकमार्क करा

ठाणे : प्रतिनिधी

सात बाऱ्यावर वारस नोंदणी करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी पोलादपुरात मंडल अधिकाऱ्याला अटक करण्यात आली. जयराम काटकर (वय ५१) असे त्यांचे नाव आहे. यात फिर्यादीची पोलादपूर येथे वडिलोपार्जित जमीन असून, वडिलांच्या पश्चात जमिनीच्या सात बारा उताऱ्यावर वारस नोंद करण्यासाठी आरोपी काटकर यांनी फिर्यादींकडे दोन हजार रुपयांची लाच मागितली होती. ही लाच स्वीकारताना काटकर यांना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचतप प्रतिबंधक विभागाचे  डीवायएसपी विवेक जोशी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.