होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नुसत्या बैठका नकोत, तानसावरील झोपड्या हटवा

नुसत्या बैठका नकोत, तानसावरील झोपड्या हटवा

Published On: Jan 18 2018 1:56AM | Last Updated: Jan 18 2018 1:42AM

बुकमार्क करा
मुंबई ः प्रतिनिधी

मुंबईकरांच्या पाण्याच्या सुरक्षेचा प्रश्‍न तेवढाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे शहर व उपनगरांना पाणीपुरवठा करणार्‍या तानसा जलवाहिनीजवळ उभारलेल्या बेकायदा झोपड्या हटवा. केवळ बैठका नको, ठोस निर्णय घ्या अशा शब्दांत उच्च न्यायालयाने राज्य सरकारचे कान उपटले.

बेकायदा झोपड्यांविरोधात जनहित मंच या संस्थेच्यावतीने भगवानजी रयानी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.  त्या याचिकेवर न्यायमूर्ती  अभय ओक आणि न्यायमूर्ती पी.एम. देशमुख यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. न्यायालयाने 2015 मध्ये या झोपड्या हटविण्याचे आदेश दिले. मात्र  या झोपड्यांच्या पुनर्वसनासंदर्भात  सरकारदरबारी केवळ बैठका घेेतल्या जातात. राज्य सरकारने या झोपडपट्टीवासीयांचे  माहूल येथे पुनर्वसन  केले आहे. परंतु हा परिसर पर्यावरणाच्या दृष्टीन योग्य नसल्याचा अहवाल राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने दिला असल्याने झोपडीवासींचा तेथे जाण्यास विरोध आहे. गेली तीन वर्षे हा प्रश्‍न प्रलंबित असल्याने पाईपलाईनजवळील झोपड्या हटविण्यास महापालिकेला अडचणी येत आहेत. 

राज्य सरकार केवळ बैठका घेत असल्याने न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. जोपर्यंत राज्य सरकार  पुनर्वसनाचा प्रश्‍न सोडवत नाही तोपर्यंत पाण्याच्या सुरक्षेचा प्रश्‍न सुटणार नाही. सरकारने केवळ बैठका धेऊन चालणार नाही, तर ठोस निर्णय धेतला पाहिजे, असेही न्यायालयाने यावेळी बजावले.