Sun, Oct 20, 2019 01:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रिलायन्स जिओकडून दहा जीबी डाटा फ्री

रिलायन्स जिओकडून दहा जीबी डाटा फ्री

Published On: Mar 05 2018 10:42PM | Last Updated: Mar 05 2018 10:42PMमुंबई : पुढारह ऑनलाईन

रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना रंगपंचमीची भन्नाट भेट दिली आहे. जिओ टीव्हीवर लाइव्ह स्ट्रिमिंगसाठी जिओकडून ग्राहकांना दहा जीबी मोफत 4G डाटा दिला जाणार आहे. जिओच्या या ऑफरमुळे जिओ ग्राहकांना आता लाइव्ह टीव्ही पाहता येणार आहे.  रिलायन्स जिओ कोणताही अतिरिक्त भार न लावत ही सुविधा देत आहे. 

रिलायन्स जिओला २०१८ चा प्रतिष्ठित ग्लोबल मोबाइल  (GLOMO) पुरस्कार मिळाला आहे. बर्सिलोना येथे आयोजित मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये मिळालेल्या पुरस्काराचा आनंद ग्राहकांसोबत शेअर करत जिओने दहा जीबी डाटा फ्री देण्याची घोषणा केली आहे. मात्र, जिओची ही ऑफर फक्त प्राइम मेम्बर्ससाठीच आहे. 

जिओने मेसेज आणि अॅप नोटिफिकेशनवरून ग्राहकांना ही माहिती दिली आहे. जिओने पाठवलेल्‍या मेसेजमध्ये म्‍हटले आहे की, ‘‘जिओ टीव्हीने मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये बेस्ट मोबाइल व्हिडिओ कंटेंटचा प्रतिष्ठित ग्लोबल मोबाइल अवॉर्ड्स २०१८ जिंकला आहे.. आम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही दिलेल्या सहकार्याबद्दल आम्ही तुमच्या अकाऊंटवर दहा जीबी कॉम्प्लिमेंट्री डाटा अॅड करत आहोत’’.

जिओने पाठलेला दहा जीबी डाटा तुम्‍हाला मिळाला आहे की नाही, हे तुम्ही रिलायन्स जिओ अॅपच्या MY Plans वर जाऊन चेक करु शकता. हा डाटा ऑटोमेटेड असल्या कारणाने काही युजर्सच्या अकाऊंटमध्ये आधीच जमा झाला आहे, पण जर तुम्हाला मिळाला नसेल तर तुम्ही १२९९ वर मिस कॉल देऊन तो मिळवू शकता.