होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हत्येच्या गुन्ह्यातील ‘तो’ आरोपी अल्पवयीनच!

हत्येच्या गुन्ह्यातील ‘तो’ आरोपी अल्पवयीनच!

Published On: Sep 03 2018 1:40AM | Last Updated: Sep 03 2018 12:53AMमुंबई : प्रतिनिधी

नातेवाईक तरुणाची हत्या केल्याप्रकरणी 18 वर्षे वय पूर्ण असल्याचे दाखवत व्ही. पी. रोड पोलिसांनी अटक केलेला तो आरोपी अल्पवयीनच असल्याचे वैद्यकीय अहवालापाठोपाठ कागदपत्रांच्या तपासणीत उघड झाले आहे. अखेर सत्र न्यायालयाने या आरोपीला बाल न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर बाल न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली आहे. आरोपी अल्पवयीन निघाल्याने पोलिसांच्या कारवाईवरचप्रश्‍नचिन्ह उपस्थीत झाले आहे.

मूळचा उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील रहिवाशी असलेला अजयकुमार कोरी (25) हा तरुण कामानिमित्त त्याच्या नातेवाईकांसोबत मुंबईत आला होता. तो नातेवाईकांसोबत गिरगावातील कुंभारवाडा परिसरात एका खोलीमध्ये राहायचा. 19 नोव्हेंबर

2016 च्या सकाळी अकराच्या सुमारास तो रल्वेनेगोरखपूर स्थानकात पोहोचला. त्याने पत्नी माधुरीदेवी हिला फोन करुन, आपली तब्येत ठिक नसल्यानेन्यायला ये असे सांगितले. त्यानुसार माधुरीदेवी अन्य एका नातेवाईकासोबत गोरखपूर स्थानकात पोहचली.नातेवाईकांनी आपल्याला मारहाण करुन रेल्वेत बसवून गावी पाठविल्याचे त्याने माधुरीदेवीला सांगितले.

उपचारांसाठी नेण्यापूर्वीच रेल्वेस्थानकातच त्याचा मृत्यूझाला. अखेर अजयकुमारचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून येथील कोतवालीनगर पोलिसांनी माधुरीदेवीची फिर्याद नोंदवून घेत याप्रकरणी गुन्हा दाखल केला. गिरगाव परिसरात मारहाणीचा हा गुन्हा घडला असल्याने तो पुढील तपासासाठी व्ही. पी. रोड पोलिसांना वर्ग करण्यात आला.व्ही. पी. रोड पोलिसांनी तपास करत याप्रकरणी मृत अजयकुमार याच्यासोबत राहात असलेल्या नातेवाईक राजू, मिश्रीलाल, मुन्शीलाल आणि अन्य एका आरोपीला अटक केली. अटकेवेळी पोलिसांनी चौथ्या आरोपीचे वय 18 वर्षे पूर्ण असल्याचे दाखविले होते. त्यामुळे अन्य तीन आरोपींसह त्याची रवानगी सुरुवातीला पोलीस कोठडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. न्यायालयीन कोठडीत गेलेल्या चारही आरोपींना जेलमध्ये पाठविण्यात आले.

हा आरोपी बाल असल्याचे सिद्ध होईपर्यंत तब्बल सव्वा वर्ष तो अन्य गुन्हेगारांसोबत जेलमध्ये होता.त्याच्याविरोधातील खटला बालन्यायालयात सुरु होताचअ‍ॅड. सालसिंगीकर यांच्या युक्तिवादानंतर न्यायालयानेत्याला 15 हजार रुपयांचा जामीन मंजूर केला आहे.