Sun, Jul 21, 2019 07:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुख्यमंत्र्यांकडून मराठी शिकायला तयार: उद्धव 

मुख्यमंत्र्यांकडून मराठी शिकायला तयार: उद्धव 

Published On: May 28 2018 1:49AM | Last Updated: May 28 2018 1:43AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

कूटनिती तसेच साम, दाम, दंड व भेदाचा अर्थ समजाऊन घेण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे मराठी शिकायला तयार असल्याचे सांगुन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात उद्भवलेल्या ऑडिओ टेपच्या वादाला नव्याने फोडणी दिली आहे. 

पालघरमध्ये शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांच्या प्रचारसभेत शिवसेनेने मुख्यमंत्र्यांची वादग्रस्त टेप ऐकवली होती. त्यावर ही टेप सेनेने मोडतोड करून ऐकविल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी  केला होता. संपूर्ण क्‍लिप ऐकविली असती तर ती ऐकविणारे तोंडावर पडले असते असेही मुख्यमंत्री म्हणाले होते. रविवारी मुंबईच्या नालेसफाईची पाहाणी करताना उध्दव  यांनी  सीएम टेपच्या वादाला पुन्हा बत्ती दिली. 

बूंद से गयी वो हौदसे नही आती

जो बूंदसे गयी वो हौद से नही आती यातच सारे काही आले असे सांगून उद्धव म्हणाले की, या टेपबद्दल आम्ही तक्रार केली आहे. त्यावर छेडछाड करून क्‍लिप ऐकविल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडूनही करण्यात आली आहे. याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता उद्धव म्हणाले,   कारवाई करा आमच्यावर करता तशी त्यांच्यावरही करा.  अनिल परब व निलम गोर्‍हे यांनीही याबाबत तक्रार केली आहे. आता माझे म्हणणे पूर्णपणे ऐका. त्यामध्ये तोडमोड करू नका. छेडछाड केली असे म्हणत असाल तर डिजिटल इंडियात मोठ्या प्रमाणावर कुशलतेने छेडछाड करणारा कोणी एडिटर  जर त्यांच्याकडे  असेल तर त्यांनी तो आणावा. मुळातच कळत नकळत मुख्यमंत्र्यानी ही ऑडिओ क्‍लिप त्यांचीच असल्याचे मान्य केले आहे. 

छेडछाडीची चौकशी करा व संबंधितावर कारवाई करा. मुळातच यातील मुख्य गाभा दाखविल्यानंतर व तो  सगळा  सलग असताना तोडमोडीचा संबंध कुठे आला ?त्यापुढे काय बोलला याला काय अर्थ आहे ?  असा सवालही उद्धव यांनी केला.