Tue, Mar 19, 2019 21:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत सुरु होणार ‘झोपडपट्टी टुरिझम’? 

मुंबईत सुरु होणार ‘झोपडपट्टी टुरिझम’? 

Published On: Jan 29 2018 12:41PM | Last Updated: Jan 29 2018 3:14PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

महाराष्ट्रात गेल्या काही वर्षापासून शेती पर्यटन ही संकल्पना रुजत आहे. या संकल्पनेत पर्यटकांना शेतातील अनुभव देण्यासाठी शेतातच राहण्याचा, राणमेवा खाण्याचा अनुभव घेता येतो. आता याच धरतीवर मुंबईतील रवी सानसी हे विदेशी पर्यटकांना मुंबईतील झोपटपट्टीत राहण्याचा अनुभव देण्यासाठी झोटडपट्टी टुरिझम सुरु करण्याचा विचार करत आहेत. 

मुंबईतील रवी सानसी हे लिंकिंग रोडवर २०१५ पर्यंत मुंबईचा नकाशा विकून आपला उदरनिर्वाह करत होते. त्यानंतर गुगल मॅपमुळे त्यांचा धंदा बसाला. मग त्यांना नेदरलँडचे बिजल यांनी परदेशी पर्यटकांना झोपटपट्टीतील जगणे कसे असते याचा अनुभव देण्याची संकल्पना सुचवली. एका रात्रीसाठी दोन हजार रुपयात याचा अनुभव घेता येईल. यामध्ये ते विदेशी पाहुणे त्या कुटुंबाबरोबर वेळ घालवतील, त्यांच्यावरोबर जेवण करतील असे सानसी यांनी सांगितले.

रवी सानसी यांच्या या संकल्पनेवर काही लोकांनी टीका केली आहे. यामुळे भारताचे जागासमोर चुकीचे चित्र निर्माण होईल. ही बाब नक्कीच भारताचा सांस्कृतीक ठेवा नाही, असे काहींचे मत आहे. सानसी यांच्या झोपडपट्टी टुरिझमचे फेसबुक पेज तयार करणारे नेदरलँडचे बिजल यांच्या मते, ज्यांना खरी मुंबई जाणून घ्यायची असेल त्यांनी झोपडपट्टीत गेले पाहिजे. कारण मुंबईतील ६० टक्के लोक झोपडपट्टीत राहतात.