Tue, Feb 19, 2019 12:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मित्राशी संबध ठेवण्यास भाग पाडत पत्नीवर बलात्कार

मित्राशी संबध ठेवण्यास भाग पाडत पत्नीवर बलात्कार

Published On: Aug 29 2018 1:43AM | Last Updated: Aug 29 2018 12:56AMडोंबिवली : वार्ताहर

ब्ल्यू फिल्मने पछाडलेल्या एका विकृताने पत्नीला आपल्या मित्रासोबत संबंध ठेवण्यास भाग पाडत त्याचे चित्रीकरण केले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याबाबत कुठे वाच्यता केल्यास व्हिडियो व्हायरल करून तुझ्या भावाचे हात-पाय कापण्याची धमकी दिली. या प्रकरणी पीडित महिलेने विकृत पती आणि त्याच्या मित्राविरोधात तक्रार दाखल केली  आहे.

कल्याण पूर्वेकडील खडेगोळवली परिसरात हे दाम्पत्य राहतात. ब्ल्यू फिल्म पाहून विकृत झालेल्या पतीने पीडित महिलेला शितपेयातून उत्तेजना वाढवणारे द्रव्य पाजले. त्यानंतर आपल्या मित्रासोबत सबंध ठेवण्यास सांगितले. याला महिलेने विरोध केला असता तुझा व्हिडियो काढून तो व्हायरल करेन, तुझ्या भावाचे हात-पाय कापण्याची धमकी त्याने दिली.

या प्रकारामुळे भयभीत झालेल्या महिलेने पती, त्याच्या मित्राचे अत्याचार सहन केले. दोघा आरोपींनी तिच्यावर अत्याचार केल्यानंतर त्याचे चित्रीकरणही केले. आपण घाबरलो तर आपल्यावर असले अत्याचार वारंवार होत राहणार, या भीतीने अखेर पीडित महिलेने पती आणि त्याच्या मित्राविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी जबानी नोंदवून दोघांविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.