Fri, Nov 16, 2018 22:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याणमध्ये गतिमंद तरुणीवर बलात्कार

कल्याणमध्ये गतिमंद तरुणीवर बलात्कार

Published On: Jan 26 2018 4:39PM | Last Updated: Jan 26 2018 5:49PMडोंबिवली : वार्ताहर

घरात एकटी असल्याचा फायदा घेत एका नराधमाने गतिमंद तरूणीवर बलात्‍कार केल्याची धक्‍कादायक घटना घडली. कल्याण पूर्व भागात घडलेल्या या घटनेत मुलीला मारहाण केल्याचाही प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी गणेश गोसावी नावाच्या नराधमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पीडित २० वर्षीय गतिमंद मुलगी आपल्या कुटुंबासह कल्याण पूर्व परिसरात राहते. गुरूवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास या तरूणीचे आई-वडील व आजी कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यामुळे घरात ती एकटी होती. घरात एकटी असल्याची संधी साधत त्याच परिसरात राहणारा गणेश गोसावी याने तिला जबरदस्तीने आपल्या घरात नेले. या ठिकाणी मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार घरी परतलेल्या आई-वडिलांना पीडित तरूणीने सांगितला. या प्रकरणी पीडित तरुणीच्या आईने कोळसेवाडी  पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गणेश गोसावी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.