Sun, Oct 20, 2019 01:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : आणखी एका ‘रामरहीम‘ला अटक

मुंबई : आणखी एका ‘रामरहीम‘ला अटक

Published On: Dec 02 2017 1:30AM | Last Updated: Dec 02 2017 11:36AM

बुकमार्क करा

धारावी : प्रतिनिधी 

तंत्र -मंत्र विद्येत निपुण असल्याचा दावा करणार्‍या एका सराईत भोंदूबाबाला सायन प्रतीक्षानगर विभागातील एका महिलेवर सलग दोनवेळा बलात्कार केल्याप्रकरणी वडाळा टी टी पोलिसांनी गुजरातच्या भावनगर येथून बुधवारी अटक केली. कांजीभाई पुंजाभाई वाघेला (50) असे त्याचे नाव असून तो भावनगर येथील शांतीनगरचा रहिवासी असल्याचे समजते. 

सायनच्या प्रतीक्षानगरमध्ये राहणारी महिला दीर्घकालीन आजाराने त्रस्त होती. घरच्यांनी अनेक उपचार करूनही तिच्या तब्येेतीत फारसा फरक पडत नव्हता. मुलीच्या यातना पाहून तिचे आई -वडील कमालीचे धास्तावले होते. त्यावेळी अनेकांनी तांत्रिक बाबाची मदत घेण्याचा त्यांना सल्ला दिला. सर्वत्र उपचार करून थकलेल्या आई -वडिलांनी एक शेवटचा उपाय म्हणून गुजरातच्या लिमडी गावात गेले. तिथे त्यांची ओळख कांजीभाई पुंजाभाई वाघेला नावाच्या मांत्रिकाशी झाली. त्यावेळी या मांत्रिक बाबाच्या शेजार्‍यांनी बाबाच्या कीर्तीचा पाढा त्यांच्यासमोर  वाचल्याने दाम्पत्याचा विश्‍वास बसला. याचाच फायदा घेत भोंदूबाबाने उपचार सुरु केला. प्रथम झाड फुक करत तुमच्या घरावर कोणी तरी करणी केली आहे. परिणामी मुलीवर करणीचे सावट असल्याने तिच्या तब्येतीत सुधारणा होत नाही, असे सांगितले. तुमच्या मुंबईतील घरात येऊन मुलीवर उपचार करावे लागतील, असा सल्लाही त्यांना दिला. 

 काही दिवसांपूर्वी मुलीच्या आईने मुलीला विश्‍वासात घेऊन विचारले असता गुन्ह्याचा पर्दाफाश झाला. परिणामी संतापलेल्या आई -वडिलांनी वडाळा टी टी पोलीस ठाण्यात भोंदूबाबा विरोधात तक्रार दाखल केली. घटनेची माहिती मिळताच वडाळा पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अमोल टमके, अनिल सुर्वे यांनी सह पोलीस निरीक्षक प्रकाश लिंगे, पोलीस हवालदार कदम, पोलीस शिपाई जाधव, शेळके, भोसले, बडगू यांचे पथक तात्काळ गुजरातच्या भावनगर येथे रवाना केले. त्यावेळी काही अज्ञात इसम आपली विचारपूस करत असल्याची खबर भोंदूबाबाला लागताच  तो तात्काळ ठिकाना बदलण्याच्या प्रयत्नात असताना मोठ्या शिताफीने पोलिसांनी  झडप घालून त्याला अटक करून मुंबईत आणले. कसून चौकशी केली असता त्याचे पितळ उघडे पडले. त्याच्यावर जादूटोणा अधिनियम तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याने अजून किती महिलांच्या अब्रूवर घाला घातला आहे याचा तपास वडाळा टी टी पोलीस करीत आहेत.