Sat, Mar 23, 2019 16:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भिडे गुरुजींच्या अटकेसाठी 26 रोजी मोर्चा

भिडे गुरुजींच्या अटकेसाठी 26 रोजी मोर्चा

Published On: Mar 16 2018 1:26AM | Last Updated: Mar 16 2018 1:10AMमुंबई : खास प्रतिनिधी

कोरेगाव-भीमा हिंसाचाराप्रकरणी मिलिंद एकबोटे यांना बुधवारी अटक झाली असली, तरी आणखी एक आरोपी संभाजी भिडे यांच्यावर मात्र अजूनही कारवाई झालेली नाही, असा आरोप करताना भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी येत्या 26 मार्चला मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणा भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज केली. 

कोरेगाव-भीमा येथे झालेला हिंसाचार भडकवण्यामध्ये मिलिंद एकबोटे यांच्याप्रमाणेच संभाजी भिडे यांचाही हात आहे. त्यामुळे मिलिंद एकबोटे यांच्यासोबतच संभाजी भिडे यांनाही अटक झाली पाहिजे. 26 मार्चपर्यंत भिडे यांना अटक झाली नाही, तर कोरेगाव-भीमा शौर्य दिन प्रेरणा अभियान आणि सम्यक विद्यार्थी आंदोलन या संघटनांकडून मुंबईत मोर्चा काढू, असे आंबेडकर म्हणाले.