Sun, May 19, 2019 22:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यसभा निवडणूक बिनविरोध : राणे, जावडेकरांचा मार्ग मोकळा

राज्यसभा निवडणूक बिनविरोध : राणे, जावडेकरांचा मार्ग मोकळा

Published On: Mar 15 2018 2:25PM | Last Updated: Mar 15 2018 2:36PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

भाजपाच्या विजया रहाटकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार आहे. सहा जागांसाठी होणा-या राज्यसभा निवडणुकीत भाजपाने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांना ऐनवेळी सातवा उमेदवार म्हणून रिंगणात उतरविल्याने निवडणूक चुरशीची होणार अशी चर्चा रंगली होती. मात्र गुरुवारी (15 मार्च) रहाटकर यांनी माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.  राज्यसभेच्या एकूण 58 जागांसाठी देशभरात निवडणूक होणार आहे. त्यातील 6 जागा महाराष्ट्रातून आहेत. 

राज्यसभेच्या निवडणूकांतील चर्चेला उधान आले असताना भाजपाच्या विजया रहाटकर यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर रिंगणात उतरविल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याची चर्चा होती. दि. १५ रोजी माघार घेण्याच्या दिवशी रहाटकर यांनी माघार घेतल्याने निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्‍पष्ट झाले आहे. 

राज्यसभेच्या ५८ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यामधील सहा जागा महाराष्ट्रासाठी आहेत. सहा जागांसाठी २३ मार्च रोजी होणारी ही निवडणूक आता बिनविरोध होणार आहे. भाजपकडून प्रकाश जावडेकर, व्‍ही. मुरलीधरन, नारायण राणे यांनी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेनेकडून अनिल देसाई तर काँग्रेसकडून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर व राष्ट्रवादीकडून वंदना देसाई यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.