Tue, Feb 19, 2019 08:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दिग्दर्शक राजकुमार संतोषी नानावट रुग्णालयात

दिग्दर्शक राजकुमार संतोषी नानावट रुग्णालयात

Published On: Mar 01 2018 12:24AM | Last Updated: Mar 01 2018 12:27AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांना छातीत दुखू लागल्याने मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हृदयरोगतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.

नानावटी रुग्णालयातील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विवेक मेहन यांनी त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी म्‍हटले आहे. राजकुमार संतोषी यांनी घायल, दामिनी, अंदाज अपना अपना, घातक, पुकार, दि लिजेंड ऑफ भगतसिंग यांसारखे दर्जेदार चित्रपट दिले आहेत. 

सध्या ते अभिनेता रणदीप हुडा याला घेऊन एका सिनेमावर काम करीत आहेत.

Film Director Rajkumar Santoshi admitted to Nanavati Hospital following some cardiac related issues. #Mumbai pic.twitter.com/EYIeFBGQnR

— ANI (@ANI) February 28, 2018