Fri, Feb 28, 2020 16:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज ठाकरे यांच्या मुलाचा आज साखरपुडा

राज ठाकरे यांच्या मुलाचा आज साखरपुडा

Published On: Dec 10 2017 7:16PM | Last Updated: Dec 10 2017 7:16PM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. आज त्यांचा फॅशन डिझायनर मिताली बोरुडे हिच्या सोबत साखरपुडा होणार असून विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर हा साखरपुडा पार पडणार आहे. 

मिताली ही प्रख्यात बेरिएट्रिक सर्जन डॉ. संजय बोरुडे यांची मुलगी आहे. अमित यांचे शिक्षण आर. ए. पोद्दार महाविद्यालयातून तर मिताली यांचे शिक्षण रुईया महाविद्यालयातून झाले आहे. तेथेच त्यांची ओळख झाली व या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. अतिशय मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’ या निवास्थानीच साध्या पध्दतीने या दोघांचा साखरपुडा होणार आहे. 

अमिते हे सध्या तरी राजकारणापासून अलिप्त आहेत. ठाकरे घराण्यात बर्‍याच दिवसानंतर सनईचौघडा वाजणार असल्यामुळे या घरगुती सोहळ्याला कोणाकोणाची हजेरी असणार आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

या कौंटुंबिक सोहळ्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे कुटुंबिय उपस्थित राहाणार का? याची सर्वांनाच उत्सुकता आहे. विशेष म्हणजे आमित आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे या भावंडांमध्ये खूप जवळीक आहे.