होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘जिओचा इतर व्यवसायिकांवर परिणाम होऊ देणार नाही’

‘जिओचा इतर व्यवसायिकांवर परिणाम होऊ देणार नाही’

Published On: Aug 08 2018 1:27PM | Last Updated: Aug 08 2018 1:28PMमुंबई : प्रतिनिधी

जिओने मोबाईलसह आता ब्रॉडबँड आणि केबल नेटवर्कमध्येही पदार्पण केल्याने इतर व्यावसायिकांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. यामुळे अशा व्यावसायिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण तयार झाले आहे. जिओमुळे राज्यातील केबल व इंटरनेट व्यावसायिकांवर परिणाम होऊ देणार नसल्याचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिला आहे.

महाराष्ट्रात केबल व इंटरनेटचा व्यवसाय करणारे तसेच त्यांच्याकडे काम करणारा कर्मचारी वर्ग संकटात येईल असे कोणतेही चुकीचे धोरण जिओ कंपनीने राबवू नये. राज्यात या क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्यांना सोबत घेऊन पुढील वाटचाल करावी, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. 

Image may contain: text

 उद्योगपती मुकेश अंबानी यांनी रिलायन्स उद्योग समुहाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जिओच्या ब्रॉडबँड सेवेची आणि केबल नेटवर्क सुरू करण्याबाबतची घोषणा केली होती. यापूर्वी जिओने वर्षभर मोफत मोबाईल इंटरनेट दिले होते. त्यानंतर माफक दरात इंटरनेट उपलब्ध केल्यानंतर इतर कंपन्यांनींही दर कमी केले होते. आता ब्रॉडबँड आणि केबल नेटवर्कमध्ये जिओ येणार असल्याने याचा सर्वाधिक फटका लहान केबल व्यावसायिकांना बसण्याची शक्यता आहे.