Wed, Nov 14, 2018 16:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मोदी लाटेचा रिव्हर्स स्विंग..बॉल टॅम्परिंगव्दारेच राज ठाकरेंचा चिमटा

मोदी लाटेचा रिव्हर्स स्विंग..बॉल टॅम्परिंगव्दारेच राज ठाकरेंचा चिमटा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी ऑनलाईन

गेल्या काही दिवसापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टिकास्त्र चालू केले आहे.  आज पुन्हा एकदा आपल्या खास व्यंगचित्र शैलीतून त्यांनी  ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे चेंडूशी छेडछाड प्रकरणाचा संदर्भ देत मोदी आणि शहा यांच्यावर निशाणा साधला. मोदी-शहांमधील 'दिल्लीच्या ड्रेसिंग रूममधील चर्चा या मथळ्याखाली मोदी आणि शहा यांना जोरदार फटकारे ओढले आहेत. 

राज ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पेजच्या माध्यमातून  निम्म्याहून जास्त व्यंगचित्रांतून मोदी-शहांचा चांगलाच खरपूस समाचार घेतलाय. हिच मालिका कायम ठेवत त्यांनी आज देखील 'दिल्लीत ड्रेसिंग रूममधील चर्चा' या व्यंगचित्रात मोदी आणि शहा यांना दाखविले आहे.

या व्यंगचित्रात मोदी आणि शहा ड्रेसिंग रूममध्ये चर्चा करत आहेत. यामध्ये शहा यांच्या हातात असलेल्या चेंडूवर  २०१४ चे जुमले असं लिहिलं आहे. याकडे मोदी निरखून पाहत असल्याचे दिसते. तर याच व्यंगचित्राच्या वर "गोतमभाईला सांगून ऑस्ट्रेलियापासून पोलिस पेपर मांगवून घासून पायला पन हे बोल पुना 2019 मदी स्विंग होएलसं वाटात नाय !," अशी चर्चा मोदी आणि शहा करत असल्याचं दाखवण्यात आल आहे.  राज ठाकरे यांनी हे व्यंगचित्र त्यांच्या फेसबुक पेजवर पोस्ट केलं आहे. याला नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाईक करत शेअर देखील केले आहे. 

Image may contain: drawing

Tags : raj thackeray, cartoon, narendra modi, amit shah,


  •