Sun, Aug 18, 2019 15:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अच्छे दिनावर राज ठाकरे यांची दूरदृष्टी

अच्छे दिनावर राज ठाकरे यांची दूरदृष्टी

Published On: May 22 2018 11:49AM | Last Updated: May 22 2018 11:49AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर रोजच वाढत आहेत. आज(दि. २२ मे) सलग नवव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ४ एप्रिल रोजी काढलेले व्यंगचित्र पुन्हा सोशल मीडियात  मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवर राज ठाकरे यांनी व्यंगचित्र काढले होते. या व्यंगचित्रातून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष आमित शहा यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. ‘बाबांनो हेच का अच्छे दिन’ या मथळ्याखाली राज यांनी हे व्यंगचित्र रेखाटले आहे. जगात तेलाच्या किमती खाली घसरल्‍या असतानासुध्दा भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी आजपर्यंतचा उच्चांक गाठला आहे. अशी टीका करत पेट्रोल भरण्यासाठी आलेल्‍या ग्राहकाला नरेंद्र मोदी आणि आमित शहा ‘हँड्स अप, निकाल पैसा’ असे म्‍हणत असल्‍याची टिप्पणी राज यांनी केली आहे.

दरम्यान, आता पेट्रोल-डिझेलचे दर जसजसे वाढू लागले आहेत तसा लोकांमधील संतापही वाढू लागला आहे. राज ठाकरे यांचे हे व्यंगचित्र अनेकजण फेसबुक आणि ट्विटरवर पोस्ट करत आहेत. 

Tags : raj thackeray,  petrol disel, narendra modi, amit shah