Tue, Jul 23, 2019 01:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाड-पोलादपूर तालुक्यात गारांचा पाऊस, आंब्याचे नुकसान 

महाड-पोलादपूर तालुक्यात गारांचा पाऊस, आंब्याचे नुकसान 

Published On: Apr 17 2018 6:22PM | Last Updated: Apr 17 2018 6:22PMमहाड : प्रतिनिधी

मंगळवारी पोलादपूर परिसरात दुपारपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. मागील दोन दिवस पावसाचे सावट शहर व परिसरात दिसत होते. अखेर मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जोराचे सोसाट्याचे वादळी वारे सुरू झाले. त्यानंतर पावसाने संपूर्ण तालुक्यात हजेरी लावून अक्षरश: झोडपून काढले.

पावसाबरोबरच तालुक्यातील काही गावांमध्ये गारांचा पाऊस पडला. पाऊस आणि जोराचा वारा याचा भेट परिणाम आंबा, काजू, फणस अशा पिकांवर पडला असून पिकांचे खूप मोठे नुकसान झाले. लादपूरात आंब्याचे पीक ह्या वर्षी चांगले बहरून आले होते, परंतु वादळी वाऱ्यामुळे आंबे गळून जमिनदोस्त झाले. अचानक आलेल्या वादळी पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसामुळे काही काळ विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला.