Sun, Jun 16, 2019 12:51
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नवी मुंबईला पावसाने झोडपले; चाकरमान्यांचे हाल

नवी मुंबईला पावसाने झोडपले; चाकरमान्यांचे हाल

Published On: Jul 09 2018 12:37PM | Last Updated: Jul 09 2018 12:37PMनवी मुंबई : प्रतिनिधी 

गेल्या दोन दिवसांपासून नवी मुंबईला पावसाने झोडपून काढले. रात्रभर मुसळधार पावसाने जोरदार बॅटींग सुरू केली आहे.  ऐरोली, वाशी, नेरुळ, घणसोली, कोपरखैरणे, खारघर, कंळबोली, कामोठे, तळोजा, पनवेलसह बेलापूरसह सगळीकडे जोरदार पाऊस सुरू आहे. 

ऐरोलीत सर्वात जास्त पावसाची नोंद झाली आहे. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे कामाला निघालेल्या चाकरमान्यांचे हाल झाले आहेत. रात्रभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पनवेल शहराला चांगलेच झोडपून काढले.

पनवेल, खारघर, कामोठे, कळंबोली आणि उलवे परिसरात चांगला पाऊस बरसू लागला आहे.  अनेक सखल भागात पाणी तुंबले आहे. तर खारघरमधील तळोजा जेल समोरील रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे.