Tue, Jan 22, 2019 20:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पावसामुळे मध्य रेल्वे मार्गावर लोकल उशिराने, प्रवाशांचे हाल

पावसामुळे मध्य रेल्वे मार्गावर लोकल उशिराने, प्रवाशांचे हाल

Published On: Jul 03 2018 10:08AM | Last Updated: Jul 03 2018 12:22PMठाणे : अमोल कदम

सतत पडत असलेल्या पावसामुळे मध्य रेल्वे मार्गावरील लोकल दहा मिनिटे उशिरा धावत आहेत. मुसळधार पाऊस पडत असल्याने मोटरमनला रूळ व्यवस्थित दिसत नाहीत. त्यामुळे लोकल हळुवार मध्य रेल्वे मार्गावर धावत आहेत. सकाळीच अंधेरी येथे रेल्वे पादचारी पूल कोसळल्याने अंधेरीला जाणारे प्रवासी घाटकोपर, दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स या ठिकाणी अडकून राहिले आहेत. त्यामुळे स्थानकात प्रवाशांची गर्दी झाली आहे. तर मध्य रेल्वे मार्गावरील लोकल दहा मिनिटे उशिरा धावत असल्याने लोकलमध्ये चढ- उतार करताना गर्दीतून वाट काढत पुढील प्रवास प्रवाशांना करावा लागत आहे.

अंधेरी येथे रेल्वे पादचारी पूल कोसळल्याने अंधेरी-चर्चगेट लोकल बंद असून मध्य रेल्वे मार्गावरील कोपर स्थानकातून-वसई लोकल सेवा सुरळीत सुरू आहेत. त्यामुळे वसईला जाण्याकरिता प्रवाशांनी कोपर रेल्वे स्थानाकातून लोकल पकडावी याकरिता कोपर-वसई लोकल सकाळी १०.२५ वा. ,११.३० वा., ०२.३० वा., ०३.३० वा. या वेळेवर सुटणार असून वसईच्या प्रवाशांनी या लोकलमधून प्रवास करावा असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.