Wed, May 22, 2019 06:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रेल्‍वेतून पडलेल्या प्रवाशाचे प्राण पोलिसाने वाचवले (Video)

रेल्‍वेतून पडलेल्या प्रवाशाचे प्राण पोलिसाने वाचवले (Video)

Published On: Aug 19 2018 8:45PM | Last Updated: Aug 19 2018 8:45PMठाणे : अमोल कदम

दादर रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक 4 वर येत असलेल्या ठाणे फास्ट लोकल गाडीतून काल दि. १८ रोजी संध्याकाळी सव्‍वा वाजताच्या सुमारास एक प्रवासी हमीद जेवल (वय २१, रा- बांगलादेश),याने लोकल फलाटावर प्रवेश करीत असताना चालू रेल्‍वेतून उलटा उतरण्याचा प्रयत्न करत असताना फलाटावर पडला. यावेळी तो लोकल खाली खेचला जात असता त्यावेळी फलाटावर बंदोबस्तासाठी असलेले पोलिस हवालदार मगरे, पोलीस हवालदार शिंदे, पोलिस शिपाई तापोळे यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून  त्याला  वाचवले, प्रवाशाच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्याला सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

या घटनेची नोंद दादर रेल्‍वे पोलिस ठारणे येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. जखमी प्रवासी हा परदेशी नागरिक असल्याने त्याच्या जवळ मिळालेल्या कागदपत्रावरून त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधून पुढील तपास लोहमार्ग पोलीस करीत आहोत. घटना घडल्याची नोंद सीसीटीव्ही फुटेज मध्ये नोंद झाली आहे.