Mon, Apr 22, 2019 04:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या गाड्या रद्द, प्रवाशांचे हाल

मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या गाड्या रद्द, प्रवाशांचे हाल

Published On: Jul 10 2018 2:56PM | Last Updated: Jul 10 2018 2:56PMमुंबई  : प्रतिनिधी 

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड परिसरात  शनिवारपासून मुसळधार कोसळणार्‍या पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय झाला आहे. त्यामुळे रेल्वे वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांचा खोळंबा झाला असून गाड्यांचे बिघडलेले वेळापत्रक पुन्हा बसवण्यासाठी मुंबई-पुणे-मुंबई अशा अप आणि डाऊन मार्गावरील ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

सतत कोसळणाऱ्या पावसाने अनेक नद्यांना पूर आला आहे. पुराचे पाणी रेल्वे रुळांवर आले असून या मार्गावरील वाहतूक अत्यंत धीम्या गतीनं सुरू आहे. त्यामुळे लांबपल्ल्याच्या गाड्यांचा खोळंबा झाला आहे. म्हणून मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या आणि पुण्याहून मुंबईला येणाऱ्या १० आणि ११ जुलैच्या ५ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्यांची वाहतूक दौड-मनमाड मार्गाने वळण्यात आली आहे.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या:

१० जुलै- पुण्याहून मुंबईकडे येणारी इंद्रायणी एक्सप्रेस
१० जुलै- पुण्याहून मुंबईकडे येणारी डेक्कन एक्सप्रेस
१० आणि ११ जुलै- पुणे-कर्जत-पुणे पॅसेंजर
११ जुलै- मुंबईहून पुण्याला जाणारी डेक्कन एक्सप्रेस
११ जुलै- मुंबईहून पुण्याला जाणारी इंद्रायणी एक्सप्रेस