Tue, Oct 22, 2019 01:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रेलिंग तुटलेल्या पुलावरून पडून चिमुकला दगावला

रेलिंग तुटलेल्या पुलावरून पडून चिमुकला दगावला

Published On: Dec 22 2017 1:28AM | Last Updated: Dec 22 2017 12:42AM

बुकमार्क करा

अंबरनाथ : प्रतिनिधी

अंबरनाथ पश्‍चिम भागातील स्वामी नगर येथील नाल्यावरील रेलिंग तुटलेल्या पुलावरून पडून राघव विरमुरगन या अडीच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.  उप नगराध्यक्ष अब्दुल शेख यांनी पालिका प्रशासनाला दोषी मानून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. 

अंबरनाथ पश्‍चिम भागातील स्वामी नगर येथील मोठ्या नाल्यावरील पूल पन्नास वर्षे जुना आहे. या पुलावरील रेलिंग तुटले आहे. पुलाची पुनर्बांधणी करण्यासाठी विद्यमान उप नगराध्यक्ष अब्दुल शेख यांनी वर्षभरापूर्वी पालिकेशी तसेच  जिल्हाधिकार्‍यांशी पत्रव्यवहार केला होता. 

दोन दिवसांपूर्वी स्वामी नगर येथील राघव मुरगन हा चिमुकला खेळत असताना या पुलावरून पडला. दोन दिवस राघव सापडून येत नसल्याने तो हरवला असल्याचा समज करून त्याची शोधाशोध करण्यात येत होती. मात्र दोन दिवसानंतर गुरुवारी त्याचा मृतदेह दिसून आला. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तो मृत झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.