ठाणे : पुढारी ऑनलाईन
मुंबईतील अंबरनाथ-बदलापूर दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रेल्वे रुळाला तडा गेल्याचे आरपीएफचे कॉन्स्टेबल सुरेश कुमार मीना यांच्या निदर्शनास आले. त्यांनी सतर्कता दाखवत लोकल थांबवायला लावली त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
रूळाल तडा गेल्याने सीएसटीच्या दिशेने येणाऱ्या गाड्या काही काळ बदलापूर स्थानकावर खोळंबल्या होत्या. यामुळे मध्य रेल्वेची लोकल वाहतूक ठप्प झाली होती. तासाभराच्या प्रयत्नानंतर वाहतूक सुरू झाली असली तरी या मार्गावरील गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांना गर्दीतूनच प्रवास करावा लागत आहे.