होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवशाही बसला अपघात; ३१ प्रवासी जखमी

शिवशाही बसला अपघात; ३१ प्रवासी जखमी

Published On: Aug 25 2018 3:35PM | Last Updated: Aug 25 2018 7:30PMरायगड : प्रतिनिधी 

रायगड जिल्ह्यातील लोणेरेजवळ राज्य परिवहन मंडळाच्या शिवशाही बसला अपघात झाला असून या अपघातात ३१ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांवर माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही बस दापोलीवरुन पुण्याकडे निघाली होती.

शनिवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास दापोलीवरुन पुण्याकडे निघालेल्या शिवशाही बसला अपघात झाला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. बस पलटल्याने ३१ प्रवासी जखमी झाले. लोणेरे गावातील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ हा अपघात घडला. जखमींना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सर्व जखमींची प्रकृती सध्या स्थिर आहे.

दरम्यान, राज्य परिवहन  मंडळाच्या शिवशाही बसच्या अपघाताच्या घटना वाढत असून, यामुळे बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला आहे.