Wed, Jul 17, 2019 18:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हा तर सरकारी अनास्थेचा बळी  : विखे-पाटील

हा तर सरकारी अनास्थेचा बळी  : विखे-पाटील

Published On: Jan 29 2018 4:11PM | Last Updated: Jan 29 2018 5:15PMमुंबई : प्रतिनिधी

धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांची आत्महत्या नसून, तो सरकारी अनास्थेने घेतलेला बळी आहे. धर्मा पाटील यांनी विषप्राशन केल्यानंतर सरकारने वाढीव अनुदान देण्याची घोषणा केली. एका वयोवृद्ध शेतकऱ्याने आपला जीव धोक्यात घातल्यानंतर सरकारला जाग येते. मग त्यापूर्वी हे सरकार झोपले होते का, अशीही संताप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केला आहे. या मृत्युप्रकरणाची तातडीने चौकशी होऊन संबंधितांविरूद्ध फौजदारी कारवाई सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

धर्मा पाटील यांना सरकारी अनास्थेमुळे न्याय मिळाला नाही.  त्यांना वेळीच न्याय का दिला नाही,याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींविरूद्ध ३०२ चा गुन्हा दाखल करण्यात यावा. धुळे जिल्ह्यातील  वीजनिर्मिती प्रकल्पाच्या भूसंपादनामध्ये घोटाळा झाला हे या आत्महत्येच्या प्रकरणावरून स्पष्ट होत आहे. भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असताना तत्कालीन आमदार व एक विद्यमान मंत्री प्रकल्पात गेलेली जमीन खरेदी करतात. आपले राजकीय वजन वापरून तातडीने जमिनीची खातेफोडही करून घेतात. मात्र त्याचवेळी धर्मा पाटील सारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याला प्रशासनाकडे हेलपाटे मारून अखेर मंत्रालयात विषप्राशन करावे लागते, हे सरकारचे मोठे अपयश  विखे पाटील म्हणाले.

संबंधित बातम्या : 

मुंबई : धर्मा पाटील यांचे पार्थिव धुळ्याला रवाना 

धर्मा पाटील कर्जबाजारी?, निरूपम यांचे अज्ञान

धर्मा पाटील यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांचा नकार

देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटायला हवी: सुप्रिया सुळे

धर्मा पाटील यांची हत्‍या; सरकारविरोधात गुन्‍हा दाखल करा