Sat, Nov 17, 2018 21:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पुण्याची श्रुती श्रीखंडे CDS परीक्षेत देशात प्रथम 

पुण्याची श्रुती श्रीखंडे CDS परीक्षेत देशात प्रथम 

Published On: Feb 02 2018 8:43AM | Last Updated: Feb 02 2018 8:45AMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या संयुक्त सुरक्षा सेवा परीक्षेत पुण्याची श्रुती श्रीखंडे मुलींमध्ये देशात प्रथम आली आहे. श्रुती ही ब्रिगेडीअर विनोद श्रीखंडे यांची कन्या आहे. 

संयुक्त सुरक्षा सेवा परिक्षेचा अंतिम निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करणा्यात आला. या अंतिम परीक्षेसाठी २३२ जन पात्र झाले होते. या परीक्षेत निपुर्न दत्ता मुलांमध्ये प्रथम तर पुण्याची श्रुती श्रीखंडे मुलींमध्ये प्रथम आली आहे. 

श्रुती श्रीखंडेने आयएलएस पुणे येथून कायद्याचे शिक्षण घेतले आहे तर तिने शालेय शिक्षण पुण्यातील आर्मी पब्लिक स्कूल मधून झाले आहे.