होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भांडूपच्या पाटील वाडीतील शौचालय कोसळले

भांडूपच्या पाटील वाडीतील शौचालय कोसळले

Published On: Apr 28 2018 10:59AM | Last Updated: Apr 28 2018 6:23PMमुंबई : प्रतिनिधी

भांडूप पश्चिमेकडील शिवाजी महाराज तलावाजवळ असलेल्या पाटील वाडीतील दुमजली शौचालय शनिवारी सकाळी कोसळले. यामध्ये दोघेजण दबले गेले असल्याचे यतीन सावंत यांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच भांडूप पोलिसांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. एक पुरुष आणि एका महिलेचा मृत्यू झाला.  

पाटील वाडीतील दुमजली शौचालय मोडकळीस आल्याच्या तक्रारी स्थानिकांनी जनप्रतिनिधी आणि पालिकेकडे केल्या होत्या. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिक करत आहेत.