Wed, Sep 19, 2018 10:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जिंदाल इंफ्रास्ट्रक्चरच्या जेटी विरोधात निषेध 

जिंदाल इंफ्रास्ट्रक्चरच्या जेटी विरोधात निषेध 

Published On: Aug 04 2018 11:52AM | Last Updated: Aug 04 2018 11:51AMठाणे : प्रतिनिधी

बोईसर जवळील नादगाव येथील प्रस्तावित असलेल्या जिंदाल इंफ्रास्ट्रक्चर जेटी विरोधात स्थानिक नागरिकांनी एल्गार पुकारला.  जिंदाल इंफ्रास्ट्रक्चरने गावातील मडळांना भेट दिलेल्या वस्तु आणि भांडी जिंदाल कंपनीच्या गेटवर फेकत गावकऱ्यांनी निषेध केला आहे.

स्थानिकांच्या म्हणन्यानुसार जिंदालकडून गावकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारची आमिष दाखवून , त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होत होता, असा आरोप नागरिकांनी व्यक्त केला आहे.

गावाच्या विकासाच्या नावाखाली व सी. एस. आर. फंडाच्या नावाखाली दिल्लीत खोटी माहिती पुस्तिका सादर केल्याचा आरोप करून नागरिक आक्रमक झाले आहेत.