होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रसाद कांबळी

नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रसाद कांबळी

Published On: Apr 06 2018 8:01PM | Last Updated: Apr 06 2018 8:01PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रसाद कांबळी निवडून आले आहेत. तर, अभिनेते गिरीश ओक यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. कांबळी यांनी मोहन जोशी पॅनेलचे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांचा पराभव केला. या निवडणुकीत अमोल कोल्हे व प्रसाद कांबळी आमनेसामने होते. मात्र, कांबळी यांनी कोल्हे यांचा पराभव करीत अध्यक्षपद खेचून आणले. 

प्रसाद कांबळी यांचा २०१८ ते २०२३ असा पाच वर्षांचा कार्यकाळ राहणार आहे.  नाट्य परिषदेच्या इतिहासात प्रथमच कोणतही वाद न होता ही निवडणूक पार पडली. गुरुनाथ दळवी यांनी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. 

असे आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे नवे नियामक मंडळ 

उपाध्यक्ष (प्रशासन) : गिरीश ओक 

उपाध्यक्ष (उपक्रम) : नरेश गडेकर 

कोषाध्यक्ष : जगन्नाथ चितळे 

प्रमुख कार्यवाह : शरद पोंक्षे 

सहकार्यवाह : सुनील ढगे, सतीश लोटके, अशोक ढेरे 

कार्यकारिणी सदस्य : 
मधुरा वेलणकर, शंकर निमकर, भरत जाधव, अविनाश नारकर, शेखर बेंद्रे, राजन भिसे, मंगेश कदम, आनंद खरवस, संदीप जंगम, उज्ज्वल देशमुख, गिरीश महाजन. 

 

Tags : producer  prasad kambli, marathi natya parishad