Mon, Nov 19, 2018 16:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पृथ्वीने विश्वास सार्थ ठरवला : संतोष पिंगुळकर (Video)

पृथ्वीने विश्वास सार्थ ठरवला : संतोष पिंगुळकर (Video)

Published On: Feb 03 2018 2:14PM | Last Updated: Feb 03 2018 2:34PMमुंबई : संदीप कदम 
मुंबईच्या पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. भारताच्या संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पृथ्वीवर दाखवलेला विश्वास त्याने सार्थ ठरवला, असे मत पृथ्वीचे प्रशिक्षक संतोष पिंगुळकर यांनी पुढारीशी बोलताना सांगितले.

संपूर्ण विश्वचषक स्पर्धेतील पृथ्वीने ज्या पद्धतीने भारताचे नेतृत्व केले ते उल्लेखनीय आहे, असे मत पिंगुळकर यांनी व्यक्त केले. पिंगुळकर यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षी पृथ्वी त्याच्यातील कौशल्य हेरले व तिथून त्याला खऱ्या अर्थाने प्रशिक्षणास सुरुवात झाली. त्याचा खेळ चांगला व्हायला लागल्यानंतर पिंगुळकर यांनी  रिझवी स्प्रिंगफिल्ड शाळेत जाण्याचा सल्ला दिला. त्यावेळी तो १२ वर्षांचा होता. 

वाचा : एकीकडे ‘शास्त्री’ तर दुसरीकडे ‘शास्त्रशुध्द’

वाचा :पृथ्वी शॉ मुंबईच्या ‘फलंदाजी’चा नवा वारस 

वाचा :U 19 विश्वचषक फायनल : ऑस्ट्रेलियाला धूळ चारत द्रविड सेना अजिंक्य

त्याने तीन ते चार वर्षे विरार वरून प्रवास केला. पण, क्रिकेटवरील त्याचे प्रेम कमी झाले नाही. या विजेतेपदामुळे खेळाडू म्हणून त्याची जडणघडण होण्यास नक्कीच फायदा होईल. बऱ्याच वर्षांनी मुंबईच्या खेळाडूने कर्णधारपद भूषवत देशासाठी विजेतेपद मिळवले ही विरार कारांसाठी आनंदाची गोष्ट आहे. विश्वचषक स्पर्धेला जाण्यापूर्वी पृथ्वी मला भेटला होता तेव्हा मी त्याला स्वाभाविक खेळ खेळण्याचा सल्ला दिला होता, असे पिंगुळकर यांनी सांगितले.