Fri, Apr 19, 2019 12:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आता प्रीपेड वीजही शक्य!

आता प्रीपेड वीजही शक्य!

Published On: Dec 24 2017 9:50AM | Last Updated: Dec 24 2017 9:50AM

बुकमार्क करा

नागपूर : प्रतिनिधी

ज्याप्रमाणे मोबाईलमध्ये, केबल टीव्हीमध्ये प्रीपेड सेवा असते, त्याचप्रमाणे विजेसाठीही आता प्रीपेड मीटर ग्राहकांना देण्याचा शासनाचा विचार  असल्याची माहिती केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री आर. के. सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी राज्याचे ऊर्जां मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. सौभाग्य योजनेच्या उद्घाटनापूर्वी पत्रकारांशी ते बोलत होते. आवश्यकते प्रमाणे वीजही आता रिचार्ज करता येणार आहे. जेवढे पैसे भरले, तेवढीच वीज वापरता येणार आहे. यामुळे ग्राहकांना आता बिल भरण्यासाठी रांगेत उभे राहण्याची गरज राहणार नाही. रिचार्ज केले नाही तर मोबाईल किंवा टीव्हीच्यासेवा बंद होतात, त्याचप्रमाणे वीजमीटरमध्येही रिचार्ज भरले नाहीतर वीजपुरवठा डिस्कनेक्ट होईल. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे हे शक्य होणार आहे.

सामान्य ग्राहकांसाठी ज्याप्रमाणे प्रीपेड सेवा उपलब्ध होणार आहे, त्याचप्रमाणे अधिक वीज वापर करणार्‍यांसाठी स्मार्ट मीटरवापरात आणले जाणार आहे. या मीटरमध्येही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून मीटरमध्ये गडबड करता येणे शक्य होणार नाही. घरात वीज पुरवठ्यात काही गडबड झाली तर त्याची माहिती थेट कार्यालयाला होणार आहे, अशीही यंत्रणा राहणार असल्याचेही केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री सिंग म्हणाले.