होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डेबिट, क्रेडिट कार्डही स्विच ऑन-स्विच ऑफ करणे शक्य 

डेबिट, क्रेडिट कार्डही स्विच ऑन-स्विच ऑफ करणे शक्य 

Published On: Mar 25 2018 2:17AM | Last Updated: Mar 25 2018 1:59AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

डिजिटल माध्यमातून व्यवहार करणार्‍यांसाठी दिलासा देणारे तंत्रज्ञान देशात दाखल झाले आहे. अ‍ॅटम टेक्नालॉजिज व ट्रॅनवॉल यांनी आणलेल्या ई-शिल्ड नावाच्या तंत्रज्ञानामुळे ग्राहकांना अतिशय सोयीस्करपणे त्यांची डेबिट व क्रेडिट कार्डे ऑन व ऑफ करता येतील.

स्मार्टफोन अ‍ॅप किंवा आर्टिफिशिअल इंटलिजन्स एनेबल्ड बॉट सेवांचा वापर करून ग्राहकांना इंटरनेट (ई-कॉमर्स), एटीएम, पीओएस टर्मिनल किंवा परकीय व्यवहार याद्वारे केल्या जाणार्‍या पेमेंट कार्डांचे व्यवहार स्विच ऑन व ऑफ करता येऊ शकतात. कोणत्या व्यवहारांना परवानगी द्यायची व कोणत्या नाही, त्यानुसार ग्राहकांना रिअल-टाइममध्ये त्यांची कार्डे/नेटबँकिंग सेट करता येऊ शकते. यामुळे  ग्राहकांना आपल्या व्यवहारावर नियंत्रण ठेवता येईल.

ई-शिल्ड तंत्रज्ञानामुळे ग्राहकांना रिअल-टाइम पद्धतीने कार्डे व खाती यांची सद्यस्थिती तपासता येते, बॅलन्स तपासता येतो व अन्यही फायदे मिळवता येतात. स्मार्ट फोन युजर त्यांच्या बँकेच्या मोबाइल बँकिंग अ‍ॅपद्वारे प्रगत स्तरातील नियंत्रण मिळवता येते. तर नॉन-स्मार्ट फोन युजर एसएमएस व यूएसएसडी याद्वारे ग्राहक त्यांच्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवू शकतात. अ‍ॅटम टेक्नालॉजिज ही देशातील एक आघाडीची डिजिटल पेमेंट सेवा देणारी कंपनी बँका, रिटेलर, शैक्षणिक संस्था, ई-कॉमर्स कंपन्या अशा विविध प्रकारच्या ग्राहकांबरोबर काम करते. या नव्या व्हाइट लेबल उत्पादनाद्वारे येत्या दोन तिमाहींमध्ये देशातील आघाडीच्या सर्व बँकांशी सहयोग करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

Tgs : mumbai,  possible to switch on and off switch with debit and credit card