Fri, Apr 26, 2019 17:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पोलिस पत्‍नीचा मंत्रालयात आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न 

पोलिस पत्‍नीचा मंत्रालयात आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न 

Published On: Jul 05 2018 7:25PM | Last Updated: Jul 05 2018 7:25PMमुंबई : प्रतिनिधी

निलंबित झालेल्या पोलिसाला परत कामावर घेण्याच्या मागणीसाठी पोलिस पत्‍नीने घोषणाबाजी करत गुरुवारी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. धनश्री पाटील असे या पोलिस पत्‍नीचे नाव असून मंत्रालय पोलिसांनी तीला तात्काळ ताब्यात घेतले आहे.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू असल्याने मंत्रालयात शुकशुकाट आहे. दुपारच्या सुमारास धनश्री पाटील  यांनी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील सरकत्या जिन्यावरून वंदे मातरम, जय किसान अशा घोषणा दिल्या.  याची खबर मिळताच आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या या महिलेला मंत्रालयात सुरक्षेवर तैनात असलेल्या पोलिसांनी ताब्यात घेतले. 

ही महिला अंधेरी येथे राहणारी असून, निलंबित पोलिस पतीला कामावर घ्यावे म्हणून अधिकाऱ्यांना भेटण्यास आली होती. पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतल्यानंतर पुढील तपास मरीन ड्राईव्ह पोलिस करीत आहेत.