Wed, Jul 17, 2019 10:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पोलिसांना मारहाण करून आरोपी पळवला

पोलिसांना मारहाण करून आरोपी पळवला

Published On: Feb 15 2018 1:57AM | Last Updated: Feb 15 2018 1:37AMनालासोपारा : वार्ताहर

वसई पश्चिमेतील माणिकपूर पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री छेडछाडीची फिर्याद देण्यासाठी आलेल्या पीडित मुलीसह तिच्या सोबत आलेल्यांना आरोपी  व त्याच्या जमावाने बेदम मारहाण करून पोलीस ठाण्यातून आरोपीला पळवून नेले. या प्रकरणी संबंधितांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून एका महिलेसह 6 जणांना अटक केली. यातील मुख्य आरोपी फरार आहे.

पीडित मुलीची गेल्या महिन्यात 24 जानेवारीला शाहीद आसिफ खान याने छेड काढली.त्यानंतर तो गप्प होता. मात्र, त्याने मंगळवारी पुन्हा हाच प्रकार केल्याने पीडित मुलीने आरडाओरड  केली व आपल्या भावाला, आईला आणि मित्रांना हा प्रकार सांगितला. त्यांनी शाहीदला समजावण्याचा प्रयत्न केला व  तिथून निघून गेले. त्यानंतर शाहीद मंगळवारी रात्री सतीश पागे व इतरांविरोधात तक्रार देण्यासाठी माणिकपूर पोलीस ठाण्यात गेला. यावेळी पागे  अन्य व्यक्ती तसेच पीडित मुलगी, तिची आई आणि अन्य तीन व्यक्ती पोलीस ठाण्यात आल्या. दरम्यान शाहीदने सतीश पागे व त्यांच्यासोबत असणार्‍या व्यक्तींना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी पोलीस त्यांना शांत राहण्यास सांगत असताना ठाणे अंमलदार कक्षाच्या समोर 20 ते 25 जणांनी जमाव करून आरडाओरडा करून सतीश पागे व त्यांच्या सोबत असणार्‍या अन्य व्यक्तींना शाहीदच्या सांगण्यावरून  मारहाण केली.

मोहमंद आशीक खान (45,रा. हाथी मोहल्ला वसई गाव), इम्तीयाज खालीद मलीक (19, रा.वालीव), मोहमंद नदीम खान (34, रा.कोळीवाडा वसई गाव ), मेहरुनिसा इम्तीयाज शेख (60, रा.विशाल नगर,वसई प), शहानवाज नाजुर शेख (28,रा. कोळीवाडा वसई गाव), मुजीम मुशीर खान (28), इमरान सदरुध्दीन अंन्सारी (28) या आरोपींना अटक करण्यात आली. मात्र, मुख्य आरोपी आणि अन्य फ रार असून त्यांचा शोध घेण्यासाठी दोन पथके नेमण्यात आली आहेत.