Sat, Jul 20, 2019 09:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मद्यधुंद पोलिसानेच फोडली चौकी

मद्यधुंद पोलिसानेच फोडली चौकी

Published On: Apr 13 2018 1:18AM | Last Updated: Apr 13 2018 12:43AMभिवंडी : वार्ताहर

भिवंडी शहर वाहतूक शाखेच्या नारपोली विभागात पोलीस खात्याला अंतर्मुख करायला लावणारी घटना घडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एका खासगी कार्यक्रमासाठी बदलापूरला येणार असल्याने त्यावेळी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून नारपोली पोलीस ठाण्यातील चार वाहतूक पोलिसांना पाचारण केले होते. मात्र यातील प्रदीप पाटील या ट्राफिक पोलिसाने बंदोबस्तासाठी जाण्यास नकार देऊन दारूच्या नशेत तर्रर्र होऊन आपल्याच पोलीस सहकार्‍यांना शिवीगाळ करत अंजूरफाटा पोलीस चौकीच्या दरवाजाच्या काचा फोडून नुकसान केले आहे. या प्रकरणी पोलीस पाटील याच्याविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांच्या मुलाच्या साखरपुड्यासाठी बदलापूर शहरात आले होते. मुख्यमंत्री ज्या मार्गाने जाणार होते, त्या मार्गावर वाहतूक कोंडी होवू नये यासाठी चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. या बंदोबस्तासाठी नारपोली पोलीस वाहतूक शाखेतून चार वाहतूक पोलिसांची नेमणूक अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली होती. मात्र प्रदीप पाटील वरिष्ठांनी नेमून दिलेले कतर्र्व्य पार न पाडता कर्तव्यावर गैरहजर राहिले. याचा जाब विचारला असता बुधवारी दुपारच्या सुमाराला दारूच्या नशेत तर्रर्र होवून दरवाजावर लाथ मारून दरवाजाची काच फोडली. 

त्यानंतर त्याने वाहतूक शाखेत वाहतूक नियोजनासाठी मिटिंगमध्ये बसलेले पोलीस निरीक्षक रमेश भामे, एएसआय पुंडलिक कोळेकर, पो. ह. शरद रायते, विनोद लोंढे, योगेश शिरसाठ, सचिन सनस, आनंद लकडे आदी कर्मचार्‍यांकडे पाहून अश्लील हावभाव करून शिवीगाळ केली.

Tags : Mumbai, Bhiwandi, police Drunk, police colleagues,  Abused, Mumbai news,