Wed, Jul 17, 2019 12:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कशेडी घाटातील खोल दरीत टॅकर कोसळला

कशेडी घाटातील खोल दरीत टॅकर कोसळला

Published On: Feb 09 2018 7:36PM | Last Updated: Feb 09 2018 7:36PMपोलादपूर : प्रतिनिधी 

मुंबई – गोवा महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आसून, राजरोस अपघात होत आहेत. या अपघातांमध्ये अनेक जन जखमी झाले आहेत तर काही जणांना मृत्यला सामोरे जावे लागले आहे. पोलादपूर हद्दीतील कशेडी घाटातील एका अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने कशेडी घाटातील खोल दरीत टॅकर कोसळला. या अपघातात सुदैवाने चालक बचावला आहे. सदरची घटना कशेडी घाटातील पार्टेवाडी गावाच्या हद्दीत शुक्रवारी दि 9 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडला.

याबाबत कशेडी महामार्ग पोलीस सूत्राकडून समजलेली सविस्तर हकीकत अशी की, टॅकर चालक प्रणवकुमार यादव (वय 30) रा उत्तर प्रदेश हा आपल्या ताब्यातील टॅकर क्र जी जे 05 बी एक्स 4699 घेऊन लोटे ते गुजरात असा जात होता. या दरम्‍यान कशेडी घाटातील पोलादपूर हद्दीतील पार्टेवाडी जवळील एका अवघड वळणावर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा टॅकर सुमारे 100 ते १२० फुट दरीत कोसळला. प्रसंगावधान राखून चालकाने गाडीतून उडी मारल्याने त्याचे प्राण वाचले.

 या घटनेची माहिती समजतात कशेडी महामार्गाचे ए एस आय श्री गमरे, श्री पवार, क्षिरसागर पारधी आदींनी घटनास्थळी धाव घेतली सदरचे ठिकाण धोकादायक असून याठिकाणी वारंवार अपघात होत असल्याचे दिसून येत आहे या ठिकाणी उपाय योजना करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे