Fri, Jul 19, 2019 23:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आंबेनळी घाटात सापडले जळालेले मृतदेह

आंबेनळी घाटात सापडले जळालेले मृतदेह

Published On: Aug 07 2018 6:11PM | Last Updated: Aug 07 2018 6:27PMपोलादपूर : प्रतिनिधी 

आंबेनळी बस अपघाताची 11 दिवसांपूर्वीची घटना ताजी असताना, पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील पायथा गावापासून अर्धा किमी अंतरावर 35 वर्षीय महिले सह 3 वर्षीय मुलाचा अर्धवट जळलेला मुतदेह सापडला आहे. सकाळी ११ च्या सुमारास ही घटना समोर आल्‍याने खळबळ उडाली आहे. मुतदेहाच्या ठिकाणी पेट्रोल च्या बाटल्या सापडल्याने घातपात ची शक्यता वर्तविली जात आहे

 पायथा च्या पुढे 35 वर्षीय महिला अडीच वर्षीय बालकाला पेट्रोल टाकून जाळले असून, सदर च्या दोन्ही व्यक्ती अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडल्या आहेत. सदरची घटना दुपारच्या वेळेस घडल्याचे सांगितले जात आहे या ठिकाणी असलेली दुचाकी युपी पासिंग ची आहे.