Sun, Nov 18, 2018 11:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › देशाचे रखवालदार झोपा काढतायत! व्यंगचित्रातून राज यांचा मोदींना टोला

देशाचे रखवालदार झोपा काढतायत! व्यंगचित्रातून राज यांचा मोदींना टोला

Published On: Feb 19 2018 9:26AM | Last Updated: Feb 19 2018 9:26AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्‍या काही दिवसांपासून आपल्‍या व्यंगचित्रातून भाजप सरकावर टीकेचा धडका सुरु केला आहे. आताही राज यांनी पंजाब नॅशनल बँकेला ११ हजार कोटींचा गंडा घालून परदेशी पळालेला हिरे व्यापारी नीरव मोदी प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. 

रविवारी प्रसिद्ध केलेल्या ‘बँक ऑफ विश्वास’  या मथळ्याखालील व्यंगचित्रात राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींनी आपण देशाचे चौकीदार असल्याच्या भाषणांमधून केलेल्या उल्लेखाचा धागा पकडून मोदींवर निशाणा साधला आहे. या व्यंगचित्रामध्ये विजय माल्ल्या, नीरज मोदी यांच्यासारखे घोटाळेबाज बँका लुटून पळताना दिसत आहेत. तर स्वत:ला चौकीदार समजणारे नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी अरुण जेटली गाढ झोपलेले दिसत आहे. तर सर्वसामान्य ठेविदार चिंतेत आहेत. 

Image may contain: 1 person

 “आहो आधीचे नालायक आहेत, ‘सांगितले’ म्‍हणून आपण वॉचमन बदलले. तर हेही झोपाच काढत आहेत आणि तरीही परिस्थिती पुन्हा तिच. अशी टीका राज यांनी व्यंगचित्रातून केली आहे. त्‍यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर हे व्यंगचित्र शेअर केले आहे.