Wed, Jul 17, 2019 10:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पाच जून 'गड दिवस' म्‍हणून साजरा व्‍हावा : संभाजी राजे (Video)

पाच जून 'गड दिवस' म्‍हणून साजरा व्‍हावा : संभाजी राजे (Video)

Published On: Jun 05 2018 1:59PM | Last Updated: Jun 05 2018 2:59PMरायगडः निलेश पोतदार/ चैतन्य डोंगरे

शिवाजी महाराजांच्या काळात निजाम, मोगल आणि आदिलशहा त्यांचे शत्रू होते. परंतु, सध्याच्या काळात प्‍लास्‍टिक, कचरा आणि दारुच्या बाटल्या या महाराजांचे शत्रू आहेत. त्यामुळे ५ जूनला साजरा होणारा पर्यावरण दिन शिवप्रेमींनी 'गड दिवस (फोर्ट डे)' म्‍हणून साजरा करावा. तसेच त्यासाठी सर्व गड आणि किल्‍ल्यांच्या ठिकाणी असणारा प्‍लास्‍टिक, कचरा नष्‍ठ करावा, असे आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले. 

खासदार संभाजीराजे बुधवार (दि. ६) जून रोजी होणार्‍या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रायगडावर आहेत. आजच्या पर्यावरण दिनी गड किल्‍ल्यांवरील प्‍लास्‍टिक आणि कचरा प्रश्नावर त्यांनी 'पुढारी ऑनलाईन'शी संवाद साधला. यावेळी त्यांनी रायगडासह सर्वच किल्‍ले कचरा आणि प्‍लास्‍टिकमुक्‍त करण्यासाठी महाराष्‍ट्रातील शिवप्रेमींनी पुढे येण्याचे आवाहन केले. 

संभाजी राजे पुढे म्हणाले की, कचरा नष्ट करण्यासाठी ५ जून जो पर्यावरण दिन म्हणूण साजरा केला जातो, तो आपल्याला फोर्ट डे (गड दिवस) म्हणूण साजरा करावा लागेल. त्यादिवशी सर्व गडांची शिवभक्तांनी स्वच्छता करायला हवी. ज्यांना ६ जूनला शिवराज्याभिषेक दिनासाठी रायगडावर येणे शक्य होत नाही, त्यांनी त्यांच्या जवळपास असणाऱ्या गडांवर जाऊन तेथील स्वच्छता करावी. जेणे करून गडांवर कोठेही कचरा, प्लास्टिक इत्यादी दिसणार नाही. रायगडावर तर वर्षाचे ३६५ दिवस कचरा दिसता कामा नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. 

फिटनेस चॅलेंज आणि विनंती

फिटनेस चॅलेंज विषयी बोलताना संभाजी राजे म्हणाले की, लोकांनी माझ्यासोबत रायगडावर चालत येण्याचे आव्हान आणि विनंतीही मी केली होती. खरेतर रायगडापेक्षा हिमालय वैगेर चढणे अवघड आहे मात्र, फिटनेस चॅलेंज देण्यापाठीमागचा माझा  उद्देश वेगळा होता. खरे शिवाजी महाराज समजायचे असतील, त्यांच्या विचारांचे खऱ्या अर्थाने स्मरण करायचे असेल तर सर्व शिवभक्त, नेते, खासदार-आमदार, कलाकार यांनी गडावर चालत यायला हवे. हे त्यामागचे माझे मत होते. तुमच्या फिटनेसला चॅलेंज देणे हा त्या पाठीमागचा उद्देश नव्हता.    


 

Tags : plastic, garbage, enemy, Shivaji Maharaj, sambhaji raje, shivrajyabhishek