Thu, Apr 25, 2019 04:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अंबरनाथमध्ये प्लास्टिक कंपनीला भीषण आग

अंबरनाथमध्ये प्लास्टिक कंपनीला भीषण आग

Published On: May 11 2018 11:07PM | Last Updated: May 11 2018 11:07PMअंबरनाथ : प्रतिनिधी

अंबरनाथमध्ये रात्री दहाच्या सुमारास प्लॅस्टिक खुर्च्या तयार करणाऱ्या एक  कंपनीला भीषण  आग लागली. या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे. 

अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या  कल्याण-बदलापूर महामार्गाशेजारी असलेल्या महावीर सेल्स ही कंपनी आगीत  पूर्णपणे जळून खाक झाली आहे. ही आग इतकी भीषण होती की अवघ्या काही मिनिटांतच संपूर्ण कंपनी जळून खाक झाली. आगीची माहिती मिळताच अंबरनाथ अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला, मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. 

दरम्यान, ही आग कशामुळे लागली हे अजून स्पष्ट झालेले नाही. आगीत मोठी वित्तहानी झाली आहे. मात्र, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.