Sat, May 30, 2020 23:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रेड झोन राज्यांचा विरोध डावलून उद्यापासून उडणार विमाने

रेड झोन राज्यांचा विरोध डावलून उद्यापासून उडणार विमाने

Last Updated: May 24 2020 1:32AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा 

नव्या कडक नियमांसह सोमवारपासून देशांतर्गत विमाने सुरू होत आहेत. विविध राज्यांनी विमाने सुरू करण्यास आक्षेप घेतला असला तरी केंद्रीय नागरिक उडायन मंत्रालय विमाने सुरू करण्यावर ठाम आहे. केंद्रीय नागरिक उड्डानमंत्री हरदिप सिंह पुरी यांनी सांगितले की, विशेषत: रेडझोनमधील राज्यांनी विमाने सुरू करण्यास विरोध केला आहे. त्यांनी घेतलेले आक्षेप विचारात घेऊनच सोमवारपासून विमानप्रवासासाठी अनेक नियम आणि निर्बंध तयार केले आहेत. देशांतर्गत विमान प्रवास करताना तुमच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अ‍ॅप असेल तर कोरोना चाचणी तुमची तुम्हीच करू शकता.

आपल्यात कोरोनाची लक्षणे नसतील आणि तुमची चाचणी निगेटिव्ह आली तर तुम्हाला क्वारंटाईन होण्याची गरज नाही. ज्यांच्याकडे आरोग्य सेतू अ‍ॅप आहे, त्याचा सिग्नल हिरवा दिसत असेल तरच अशा लोकांना देशांतर्गत सोमवारपासून सुरू होणार्‍या विमान प्रवासाची परवानगी मिळणार आहे. ऑगस्टपूर्वी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल. पूर्ण क्षेमतेने नाही तरी काही प्रमाणात ही सेवा सुरू होईल, असेही पुरी यांनी सांगितले.