होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चित्रपट निर्माते, अभिनेते नीरज व्होरा यांचे निधन

चित्रपट निर्माते, अभिनेते नीरज व्होरा यांचे निधन

Published On: Dec 14 2017 10:43AM | Last Updated: Dec 14 2017 11:35AM

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

हिंदी चित्रपट निर्माते आणि लेखक आणि अभिनेते नीरज व्होरा यांचे दिर्घ काळाच्या आजारनंतर आज (गुरूवार) निधन झाले. ते ५४ वर्षांचे होते. आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास क्रिटी केयर हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज दूपारी ३ वाजता सांताक्रूज स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

नीरज यांना गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये ह्रदयविकाराचा झटका आला होता. यानंतर त्यांना एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. एक वर्षापासून ते कोमात होते. त्यांचा मित्र फिरोज नडियाडवाला यांनीच त्यांची संपूर्ण जबाबदारी उचलली होती.  

काही दिवसांपासून  नीरज फिरोजच्या ‘बरकत विला’ या मुंबईतील घरीच होते. फिरोजने नीरजची व्यवस्था तिथेच केली होती. डॉक्टर्स स्वत: घरी येऊन नीरज यांचे चेकअप करत असत. गेल्या चार दिवसांपासून त्यांना हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

चित्रपट

नीरज वोरा यांनी त्यांच्या करिअरची सुरूवात होली (१९८४)मधून सहाय्यक अभिनेता म्हणून केली होती. अमिर खानच्या ‘रंगीला’ मधून त्यांना नवी ओळख मिळाली. अक्षय कुमारच्या ‘खिलाडी ४२०’ या चित्रपटातून जीरज नीरज निर्मिती क्षेत्रात उतरले. यानंतर ‘वेलकम बॅक’, ‘बोल बच्चन’, ‘खट्टा मीठा’, यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. आमिर खानच्या ‘रंगिला’ या चित्रपटासाठी त्यांनी लिखान केले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, तुषार कपूर, अक्षय कुमार अनेक कलाकारानी नीरज यांना ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.‘ फिर हेरा फेरी’ सांरख्या अनेक चित्रपटांचे लेखक आणि निर्माते नीरज वोरा आता आपल्यात नाहीत, ओम शांती’ असे ट्विट परेश रावल यांनी केले आहे. 


Related image

 

Image result for niraj vora MOVIE

Image result for niraj vora MOVIE