Sun, Aug 25, 2019 19:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पेट्रोल-डिझेलच्या दरात अकराव्या दिवशीही वाढ 

पेट्रोल-डिझेलच्या दरात अकराव्या दिवशीही वाढ 

Published On: May 24 2018 8:33AM | Last Updated: May 24 2018 8:33AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

कर्नाटक निवडणुकीसाठी रोखून धरलेले  पेट्रोल-डिझेलचे दर निवडणूक झाल्‍यापासून रोज वाढत आहेत. आज (दि. २४)सलग अकराव्या दिवशीही पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. आज पेट्रोल ३० तर, डिझेलमध्ये ३७ पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आता पेट्रोल ८६ रूपये लिटर झाले आहे. 

देशात सर्वात महाग पेट्रोल- डिझेलची विक्री महाराष्ट्रात होत आहे तर, राज्‍यत सर्वात महाग पेट्रोल सोलापूर जिल्‍ह्‍यात(८५ रुपये ७५ पैसे)मिळते. कर्नाटक निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत. कर्नाटक निवडणुकीच्या काही दिवस आधी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नव्हते. त्यानंतर मागील दहा दिवसांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत रोज वाढ होत आहे.

गेल्या नऊ दिवसांत पेट्रोल 2.24  व डिझेल 2.15 रुपयांनी वाढले आहे. गेल्या 26 महिन्यांत पेट्रोलचे दर 36 टक्के व  डिझेलचे  दर 54 टक्क्यांनी वाढले आहे. तेल कंपन्यांचा नफाही वाढला आहे. पेट्रोलच्या दरामध्ये सतत वाढ होत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशांना आग लागली आहे. सोशल मीडियावर केंद्र सरकारविरोधात पेट्रोल दरवाढी विषयामुळे मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. पेट्रोलियम कंपन्यांचा प्रत्यक्ष दर पेट्रोलसाठी 37.19 रुपये आहे. त्यावर 25.44 टक्के एक्साईज ड्युटी, 21.26 टक्के व्हॅट व 4.72 टक्के डिलर्स कमिशन आकारले जाते. जवळपास 52 टक्के कर लादल्यानंतर सर्वसामान्य जनतेला पेट्रोल विक्रीसाठी उपलब्ध केले जाते. केंद्र सरकारने तर उत्पादन शुल्क घटविण्यास नकार देत हात झटकले आहेत.


Tags : petrol diesel prices, karnataka elections