Sat, Jun 06, 2020 19:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पेट्रोल-डिझेलच्या दरात दहाव्याही दिवशी वाढ

पेट्रोल-डिझेलच्या दरात दहाव्याही दिवशी वाढ

Published On: May 23 2018 8:33AM | Last Updated: May 23 2018 8:33AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

कर्नाटक निवडणुकीसाठी रोखून धरलेले  पेट्रोल-डिझेलचे दर निवडणूक झाल्‍यापासून रोज वाढत आहेत. आज (दि. २३)सलग दहाव्या दिवशीही पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. आज पेट्रोल आणि डिझेलमध्ये ३० पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आता पेट्रोल  ८६ रूपये लिटर झाले आहे. 

देशात सर्वात महाग पेट्रोल- डिझेलची विक्री महाराष्ट्रात होत असून, कर्नाटक निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत. कर्नाटक निवडणुकीच्या काही दिवस आधी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नव्हते. त्यानंतर मागील ९ दिवसांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत रोज वाढ होत आहे.

दरम्‍यान, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची आज पेट्रोल वितरकांसोबत बैठक होणार आहे. या बैठकीत इंधन दरवाढीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

Tags : petrol diesel prices, karnataka elections