Thu, Jun 04, 2020 01:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, औषधांची दुकाने २४ तास खुली ठेवण्यास परवानगी 

जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, औषधांची दुकाने २४ तास खुली ठेवण्यास परवानगी 

Last Updated: Mar 26 2020 7:18PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

संचारबंदी आणि लॉकडाऊन काळात लोकांना जीवनाश्यक वस्तू मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने यांना २४ तास उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे. अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करुन दिली आहे.

मात्र, संबंधित दुकानांनी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. दोन ग्राहकांमधील अंतर, निर्जंतुकीकरण, स्वच्छता याबाबत शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शन सूचना पाळाव्या लागतील, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, कोरोना उपयाययोजना संदर्भात आज गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. विशेष म्हणजे बंदिस्त वातावरण टाळून आणि अधिकाऱ्यांच्या बैठक व्यवस्थेत योग्य अंतर ठेवून ही बैठक घेण्यात आली.

राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या १२४ झाली आहे. काल संध्याकाळी, मुंबई १ व ठाणे १ असे २ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी १५ जण बरे होऊन रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत.