Tue, Jul 16, 2019 02:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : टॉयलेटमधून फोन केला, आम्हाला वाचवा!

मुंबई : टॉयलेटमधून फोन केला, आम्हाला वाचवा!

Published On: Dec 30 2017 1:24PM | Last Updated: Dec 30 2017 1:40PM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

कमला मिलमधील हॉटलमध्ये जे अग्नितांडव झाले, त्यामध्ये १४ जणांचा मृत्यू झाला. यात ११ महिलांचा समावेश आहे.आगीमुळे घाबरलेल्या काही लोकांनी टॉयलेटमध्ये कोंडून घेतल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. जीव वाचविण्यासाठी त्याच टॉयलेटमधून केलेला फोन शेवटचा ठरला.

घाटकोपरच्या कविता धाराणी आणि तेजल गांधी या बहिणी ३१ डिसेंबरच्या पार्टीचे प्लॅनिंग करण्यासाठी आपल्या नातेवाइकांसोबत मोजोस हॉटेलमध्ये जेवायला गेल्या होत्या. मात्र दुर्दैवाने अग्नितांडवात त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची कहाणी अतिशय चटका लावणारी आहे. ३१ डिसेंबरला पाचगणीला जायचे असे जेवता जेवता त्यांनी ठरवले. मात्र, त्याचवेळी आग लागली आणि हे सर्व कुटुंब मोजो हॉटेलमधून धावत वन अबाव्ह हॉटेलमध्ये धावत गेले. भीषण आगीमुळे कोणाला काय करायचे हेच कळत नव्हते. या दोघी बहिणी जीव वाचवण्यासाठी हॉटेलच्या टॉयलेटमध्ये घुसल्या. तिथून तेजलने त्यांच्या भावोजींना फोन करुन, आग लागल्याचे सांगितले. त्यांना बाहेर काढण्यास सांगितले. या दरम्यान त्यांचे सर्व नातेवाईक बाहेर पडले, परंतु या बहिणी आतमध्ये अडकल्या आणि त्यांचा गुदमरुन मृत्यू झाला. यामुळे संपूर्ण धारणी आणि गांधी कुटुंबासह घाटकोपर पूर्व विभागात शोककळा पसरली आहे.