Sun, Jan 19, 2020 16:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ(video)

कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ(video)

Published On: Jul 23 2019 8:08PM | Last Updated: Jul 24 2019 1:40AM
कल्याण :  प्रतिनिधी

अन्नपदार्थ विक्री करणारे व्यावसायिक हे स्वत:च्या फायद्यासाठी  नागरिकांच्या आरोग्याशी खेळत अस्वच्छ पद्धतीने अन्नपदार्थांची विक्री करत स्वत:च्या तुंबड्या भरत आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवून बिनदिक्कतपने आपला व्यवसाय करत आहेत. कल्याण रेल्वे स्थानकातील २ नंबर प्लेटफॉर्मवरील उपारग्रहातील असाच एक प्रकार सोशल  मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओतून समोर आला आहे.  

कल्याण रेल्वे स्थानकावरील २ नंबर फलाटावर खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्या स्टॉलवर टिटवाळा येथील समाजिक कार्यकर्ते रवींद्र बिरारी हे पाणी घेण्यासाठी गेलेले असताना त्या ठिकाणी काम करणारे कामगार हे समोशाबरोबर देण्यात येणारी चटणी  अतिशय घाणेरड्या प्लास्टिकच्या बादलीतून काढून ग्राहकांना देत असल्याचे निदर्शनास आले. यानंतर बिरारी यांनी या प्रकाराचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये शूट केला आणि संबंधित व्यक्तीस जाब विचारला. यावेळी विकेत्याने त्यांना उडवा-उडवीची उत्तरे दिली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वायरल झाला असून रेल्वे प्रशासन यावर नेमकी काय कारवाई करेल याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे. 

समाजसेवक रवींद्र बिरारी यांनी आपण याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेऊन रल्वे मंत्र्यांना देखील याबाबत पत्रव्यवहार करणार असल्याचे सांगितले. घाणेरडे लिंबू सरबत असो अथवा पाणीपुरी आणि आता हा प्रकार, असे अनेक प्रकार या आधीही समोर आले आहेत. त्यामुळे सध्या तरी धोकादायक रेल्वे प्रवासाबरोबरच ही देखील एक धोकादायक बाब प्रवाशांच्या वाट्याला आली आहे असेच म्हणावे लागेल, असे मत बिराली यांनी व्यक्त केले.