Tue, Apr 23, 2019 13:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › क्रिकेटपटू शार्दुलचे आई-वडील अपघातात जखमी 

क्रिकेटपटू शार्दुलचे आई-वडील अपघातात जखमी 

Published On: May 09 2018 10:39AM | Last Updated: May 09 2018 10:39AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

भारतीय क्रिकेटपटू शार्दुल ठाकूरचे आई-वडील एका अपघातात जखमी झाले आहेत. शार्दुलचे वडील नरेंद्र ठाकूर आणि आई हंसा ठाकूर यांचा पालघर जवळ अपघात झाला. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

नरेंद्र आणि हंसा ठाकूर मंगळवारी रात्री एका लग्नासाठी पालघरला गेले होते. मोटरसायकलवरून परत येताना हा अपघात झाला. गाडी घसरल्याने शार्दुलचे आई-वडील गाडीवरून खाली पडले. या दोघांवर रुग्णालयात उपचार  सुरु असून त्यांच्या प्रकृतीला कोणताही धोका नसल्याचे सूत्रांनी सांगितले. 

शार्दुल सध्या इंडियन प्रिमियर लीग स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सकडून खेळत आहे. साध्या राहणीमानामुळे शार्दुल काही दिवसांपूर्वी चर्चेत आला होता. दक्षिण आफ्रिकेचा दौरा संपल्यानंतर भारतात परतलेल्या शार्दुलने लोकलने प्रवास केला होता. भारतीय संघात स्थान मिळवण्याआधी शार्दुल पालघर, अंधेरी हा प्रवास लोकलनेच करत होता.