Thu, Jul 18, 2019 04:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पनवेल-वडाळा लोकलचे बेलापूर रेल्वे स्थानकात शिवसेनेकडून स्वागत

पनवेल-वडाळा लोकलचे बेलापूर रेल्वे स्थानकात शिवसेनेकडून स्वागत

Published On: Jan 26 2018 2:42PM | Last Updated: Jan 26 2018 2:42PMनवी मुंबई : प्रतिनिधी 

हार्बर व ट्रान्स हार्बर मार्गावरील वाढविण्यात आलेल्या अतिरिक्त १६ फेऱ्या यांचा लोकार्पण सोहळा आज दि. २६ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या हस्ते पार पडले. हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे करण्यात आले आहे. पनवेल ते वडाळा या लोकलचे स्वागत सातत्याने पाठपुरावा करणारे खासदार राजन विचारे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना उपनेते विजय नाहाटा यांच्याकडून बेलापूर रेल्वे स्थानकामध्ये रेल्वेच्या मोटरमन यांचा सत्कार करण्यात आला.

यानंतर हिरवा झेंडा दाखवून ही लोकल पुढे सोडण्यात आली. बेलापूर संपर्कप्रमुख विठ्ठल मोरे, गटनेते द्वारकानाथ भोईर, शहरप्रमुख विजय माने, नगरसेवक दिलीप घोडेकर, रतन माडवे, विभागप्रमुख निळकट म्हात्रे, मिलींद सुर्येराव, युवासेना बेलापूर, उपविधानसभा अधिकारी सिध्दाराम शिलवंत, शाखाप्रमुख महेश कोटीवाले, विशाल विचारे, गणेश घाग आदी उपस्थित होते.